नांदगाव- नांदगाव तालुक्यातील मंगळणे ग्रामपंचायतीच्या सरपंच सुगंधा रामभाऊ पवार आणि सदस्य संजय बापु पाटील यांनी निवडणूक नामनिर्देशन पत्रात शौचालय बाबत स्वयंघोषणापत्रात खोटी माहिती सादर केल्याने त्यांना मालेगावचे अप्पर जिल्हाधिकारी धनजंय निकम यांनी अपात्र ठरवले आहे.
या प्रकारची तक्रार मंगळणे येथील हरीदास पोपट पाटील यांनी दाखल केली होती. त्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी यांनी चौकशी करुन सरपंच सुगंधा पवार व सदस्य संजय पाटील यांचे ग्रामपंचायत सदसत्व रद्द केले आहे.तक्रारीवरुन केल्यानंतर गटविकास अधिकारी यांच्याकडील विस्तार अधिकारी यांनी सरपंच सुगंधा पवार यांच्या घराची पाहणी केली. या पाहणीत शौचालय आढळुन आले नाही. तसेच संजय बापु पाटील यांच्या आईच्या घरी देखील शौचालय आढळून आले नाही. मंगळणे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांच्या अहवालात रजिस्टर नं ८ मध्ये शौचालयाची नोंद आढळुन आली नाही. त्यामुळे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. सदर आदेशा विरुद्ध विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडे पंधरा दिवसांच्या आत अपील दाखल करता येईल असे आदेशात नमूद केले आहे. सरपंच सुगंधा पवार व सदस्य संजय पाटील यांची बाजू अॅड.एम.डी.हिरे व अॅड.एस.एम. काकड यांनी काम पाहिले.