नवी दिल्ली – देशाच्या क्रीडा क्षेत्रातल्या सर्वोच्च राजीव गांधी ‘खेलरत्न’ पुरस्कारासाठी चार खेळाडूंची शिफारस करण्यात आली आहे. यामध्ये क्रिकेटपटू रोहित शर्मा, महिला कुस्तीगीर विनेश फोगट, टेबल टेनिसपटू मणिका बात्रा आणि पॅराऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत उंच उडी मध्ये सुवर्णपदक विजेत्या मरियप्पन थंगावेलूचा समावेश आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या दिल्लीतल्या मुख्यालयात झालेल्या निवड समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. याआधी क्रीडा मंत्रालयाच्या निवड समितीनं अर्जुन पुरस्कारासाठी २९ खेळाडूंची शिफारस केली आहे. यामध्ये गोलंदाज इशांत शर्मा, क्रिकेटपटू दीपक हुडा, हॉकीपटू दीपिका ठाकूर, टेनिसपटू दिवीज शरण यांचा समावेश आहे.