तुम्ही ios म्हणजे आयफोन / आयपॅड वापरत आहात का ? अँन्ड्रॉईड प्रमाणेच यही सिस्टिमचे नियमित updates येत असतात. प्रत्येक अपडेटमध्ये काही न काही नवीन सोयी मिळत असतात. लवकरच ios चे १४.५ क्रमांकाचे व्हर्जन येत आहे. त्यातही चांगल्या सुविधा तुम्हाला मिळतील. कोणत्या ते बघा ..
१. फेसलॉक ही एक चांगली यंत्रणा ios मध्ये आहे. परंतु आता कोरोंनामुळे सर्वांच्या चेहेऱ्यावर मास्क आले आणि ही यंत्रणा काम करेनाशी झाली. मग प्रत्येक वेळेस पिन नंबर टाइप करणे आले. यावर अॅपलने एक तोडगा काढलाय, पान तो सर्वांच्या सोयीचा नाही. तुम्ही अॅपल घडयाळ वापरत असाल तरच मास्कसह चेहेरा ओळखण्याचे काम आयफोन करील. ही सोय १४.५ व्हर्जन मध्ये असेल. हे घडयाळ सगळे वापरत नाहीत, त्यामुळे जे वापरतात त्यानाच फायदा आहे.
२. आयफोनवर कोणता डिफॉल्ट म्युझिक प्लेयर वापरायचा ते तुम्ही ठरवू शकाल. जेव्हा संगीत ऐकण्यासाठी ‘सिरी’ल आदेश द्याल, तेव्हा सिरी तुम्हाला कोणता डिफॉल्ट म्युझिक प्लेयर हवा आहे ते विचारेल. तुम्ही तो निवडू शकता, अशी सोय नव्या व्हर्जनमध्ये असेल.
३. नवे व्हर्जन डाउनलोड केले की तुम्हाला 5G dual-SIM सपोर्ट मिळेल. म्हणजेच एक नहमीचे SIM slot आणि दुसरे digital eSIM तुम्ही वापरू शकाल. भारतात या वर्षाअखेरपर्यंत 5 g येईल अशी अपेक्षा आहे.
४. बऱ्याच वेळ apps तुम्हाला ट्रॅक करण्याची परवानगी मागतात. म्हणजेच तुम्ही फोनवर जे काही करता, त्याची नोंद ठेवण्याची परवानगी तुम्ही देऊन ताकत. त्याचे काय परिणाम होतील याची काळजी न करता. नवीन व्हर्जन मध्ये तुम्ही कोणती apps आपला फोन ट्रॅक करत आहेत याची माहिती देतील. मग वाटल्यास तुम्ही ती परवानगी रद्द करू शकता. फेसबूक यामुळेच संतापले आहे. आमच्या उद्योगावर विपरीत परिणाम होईल, असे त्यांचे म्हणणे आहे. परंतु ही सोय ग्राहकांच्या सोयीची आहे.
५. पाचवी सोय म्हणजे तुम्ही PlayStation 5’s DualSense and Xbox Series X’s controllers.वर नियंत्रण ठेवू शकता.
अॅपल हे नवीन व्हर्जन नेमके कधी आणणार आहे ते माहीत नाही. पण लवकरच ते संगल्यान ते मिळेल अशी आशा आहे.
(ज्येष्ठ पत्रकार अशोक पानवलकर यांच्या वेबसाईटवरुन साभार)