मुंबई – दिवाळीच्या तोंडावर बँक कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुषखबर आहे. बँक युनियन आणि इंडियन बँकिंग असोसिएशन (आयबीए) यांच्यातील वेतनवाढीची बोलणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे देशातील तब्बल ८.५ लाख बँक कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळणार आहे. ही वाढ १५ टक्के एवढी राहणार आहे. तशी माहिती आयबीएचे अध्यक्ष सुनिल मेहता यांनी दिली आहे. दोन्ही संघटनांमध्ये द्विपक्षीय वेतन करार करण्यात आला आहे. ही वेतनवाढ १ नोव्हेंबर २०१७ पासून लागू होणार आहे. आगामी ५ वर्षांपर्यंत हा करार लागू राहणार आहे. देशातील विविध ३७ बँकांमधील कर्मचाऱ्यांना या वेतनवाढीचा लाभ मिळणार आहे.