मॉस्को – पहिल्या कोरोना लसीनंतर आता रशियाने दुसऱ्या कोरोना लशीलाही मंजुरी दिली आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी त्याची घोषणा केली आहे. त्यामुळे पहिल्यांदाच एका देशाची दुसरी कोरोना लस आली आहे. दरम्यान, रशियन अकॅडमी ऑफ सायन्सने तिसरी लसही तयार केली आहे. ती सुद्धा लवकरच येईल, असे पुतीन यांनी सांगितले आहे.
सुमारे १०० स्वयंसेवकांवर ही लस वापरण्याचा प्रयोग करण्यात आहे. या चाचणीत भाग घेतलेले स्वयंसेवक १८ ते ६० या वयोगटातील होते. पीटीआय या वृत्तसंस्येच्या म्हणण्यानुसार, या लसीचा प्रयोग दोन महिन्यांपासून सुरू आहे आणि दोन आठवड्यांपूर्वी प्राथमिक अभ्यास पूर्ण झाला आहे. लस सुरुवातीच्या चाचण्या यशस्वी ठरली आहेत आणि अभ्यास पूर्ण झाल्यानंतर मंजूर झाली आहेत.
१२ ऑगस्ट रोजी, कोरोनाचा तिसरा टप्पा पूर्ण होण्यापूर्वी रशियाने जगातील पहिली लस स्पुटनिक-व्ही या लसीला मान्यता दिली होती आणि आता त्यांनी एपिवाक कोरोना या दुसर्या कोरोना लसला मान्यता दिली आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी देशातील दुसर्या कोरोना लसीला मान्यता दिल्याची घोषणा केली. सरकारी अधिकाऱ्यां समवेत झालेल्या बैठकी दरम्यान व्लादिमीर पुतीन यांनी जाहीर केले की, देशात कोरोना विषाणूची लस ‘एपिव्हॅक कोरोना’ मंजूर झाली आहे. सुरुवातीच्या काळात चांगले निकाल दिल्यानंतर लस मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. दुसर्या लसीची घोषणा करताना पुतीन म्हणाले की, आता आम्हाला पहिल्या आणि दुसर्या लसीचे उत्पादन वाढविणे आवश्यक आहे. ही एपिवाक कोरोना लस पेबिडाइड आधारित असून ती सायबेरियातील वेक्टर इन्स्टिट्यूटने तयार केली आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी या लसीचे दोन डोस देणे आवश्यक आहे.