नाशिक – अनलॉक जाहीर होताच राज्यातील बससेवा हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळच्या नाशिक आगारतर्फे यवतमाळ आणि लातूर या शहरांसाठी बससेवा सुरु करण्यात आली आहे. आज (१० ऑक्टोबर) पासून नाशिक येथून यवतमाळ आणि लातूर साठी बस सुटणार आहे.
काही दिवसांपासून लांब पल्याच्या प्रवासासाठी परिवहन मंडळाने बससेवा पूर्ववत करण्यासाठी साकारात्मक पावले उचलत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे प्रवाशांना या सुविधेचा फायदा होणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी सेमी स्लीपर कोच बसची व्यवस्था करण्यात आली आहे. नाशिक हुन यवतमाळसाठी सायंकाळी ७.३० वाजता बस सुटणार असून लातूरसाठी सांयकाळी ७ वाजता बस सुटणार आहे. बसमध्ये प्रवास करतेवेळी मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. त्याशिवाय कोणत्याही प्रवाशाला प्रवेश दिला जाणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे.