मुंबई – भारतातील सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (बी.एस.एन.एल.)ने आपल्या ब्रॉडबँडच्या प्लान्समध्ये अमुलाग्र बदल केलेले आहेत. आता युजर्स या प्लान्सच्या माध्यमातून वेगवान इंटरनेटसह अधिक डेटादेखील प्राप्त करू शकतील.
एवढी मिळणार गती
नवीन योजनेनुसार बी.एस.एन.एल. च्या भारत फायबरच्या ग्राहकांसाठी ४ टी.बी. पर्यंतचा डेटा २०० एम.बी.पी.एस.च्या गतीसह उपलब्ध होणार आहे. सध्या ही योजना चेन्नईमध्ये कार्यान्वित करण्यात आली असून चेन्नई मधील फायबर-टू-होम ग्राहकांसाठी हा प्लान उपलब्ध करून देण्यात आला आहे. या योजनेमध्ये ४९९ रुपये, ७७९ रुपये, ८४९ रुपये , १२७७ रुपये आणि १९९९ रुपये असे प्लान्स सुरु करण्यात आले आहेत.
हे सुद्धा मोफत
बदलेल्या प्लान्स नुसार आता १०० एम.बी.पी.एस. स्पीड चा लाभ मिळणार आहे. काही प्लान्समध्ये तर डिस्नी आणि हॉटस्टारचा प्रीमियम एक्सेसदेखील मोफत दिला जाणार आहे. ज्या प्लान्सला नव्या स्वरूपात आणले गेले आहे ते सर्वच बी.एस.एन.एल.च्या अफोर्डेबल भारत फायबर योजनेच्या अंतर्गत येणारे आहेत.

४९९चा प्लॅन
बी.एस.एन.एल.च्या ४९९ रुपये किमतीच्या प्लान बद्दल सांगयचे झाल्यास यात ५० एम.बी.पी.एस. पर्यंत ची स्पीड मिळेल आणि याचा उपयोग १०० जीबी पर्यंत करता येईल. ही लिमिट संपल्यानंतर स्पीड कमी होऊन २ एम.बी.पी.एस. होईल.

७९९चा प्लॅन
रुपये ७९९ च्या प्लान मध्ये युजर्सना १०० एम.बी.पी.एस. इतका स्पीड मिळेल आणि ३०० जीबी पर्यंत डेटा प्राप्त होईल. सोबतच डिस्नी आणि हॉटस्टार चा एक्सेस सुद्धा मिळेल. ३०० जीबीची लिमिट संपल्या नंतर स्पीड ५ एम.बी.पी.एस. इतकी कमी होईल.
८४९ चा प्लॅन
रु. ८४९ च्या प्लान मध्ये १०० एम.बी.पी.एस.चा स्पीड आणि ६०० जीबी डेटा देनात येत आहे. याशिवाय ९४९ रुपयांच्या प्लान मध्ये १०० एम.बी.पी.एस.ची स्पीड, ५०० जीबी डेटा आणि डिस्नी + हॉटस्टार चा एक्सेस दिला जाणार आहे. १२७७ रुपयांचा भारत फायबर प्लान २०० एम.बी.पी.एस. ची स्पीड आणि ३.३ टीबी डेटा देईल तर १९९९ वाल्या प्लान मध्ये २०० एम.बी.पी.एस. स्पीड सह ४ टीबी डेटा उपलब्ध होणार आहे.