नाशिक – संघ लोकसेवा आयोगाच्या उमेदवारांना परीक्षेस जाण्या साठी नाशिक – पुणे मार्गावर चार विशेष बसेसचे आरक्षण सुरु झाले आहे. विद्यार्थ्यांना अगोदरच हे आरक्षण आता करणार आहे. ४ अॅाक्टोंबर रोजी रात्री १२.३०, १२.४५, १.०० व १.१५ या वेळात या बसेस सुटणार आहे. सदर बसेस ४ तारखेस सकाळी पुणे येथे ६ वाजेपर्यंत पोहोचतील
संघ लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीच्या परीक्षांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने विशेष बस सोडण्याचा निर्णय अगोदरच घेतला होता. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या लोकसेवा आयोगाच्या ३८ केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार असून नाशिकच्या विद्यार्थ्यांना ही व्यवस्था एसटीने उपलब्ध करुन दिली आहे.