नाशिक – संघ लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीच्या परीक्षांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नाशिक विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी विशेष बस सोडण्यात येणार आहे. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी नाशिक हुन मुंबईसाठी विशेष बस सोडण्यात येणार आहे. मुंबई येथे २ सत्रात एकूण ३८ केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार असून नाशिकच्या विद्यार्थ्यांना मुंबईला जाण्यासाठी खास बस सुटणार असल्याचे परिवहन महामंडळाने म्हंटले आहे. ३ ते ५ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या परीक्षेसाठी आवश्यकतेनुसार जादा बस सोडण्यात येणार असल्याचे परिवहन मंडळाने म्हटले आहे. त्यासंबंधी परिपत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले असून त्यात सर्व माहिती देण्यात आली आहे.