नाशिक – औद्योगिक महामंडळाने गाळे प्रकल्पाची योजना जाहीर केले, परंतू, बांधकाम व्यवसायीकांना भूखंड देऊन वाढीव दराने गाळे विक्री झाले. परंतु याला विरोध कायम ठेऊन ,मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देऊन प्रदीप पेशकार, व त्यांच्या सहकाऱ्यांनी औद्योगिक महामंडळ व सरकार कडे पाठपुरावा चालू ठेवला त्याला आता यश मिळाले आहे. या गाळ्यांची किंमत आता १० टक्के कमी करण्यात आली आहे.
१६ आॅक्टोबर २०२० या संचालक मंडळाच्या बैठकीत सदर गाळ्यांचे दर हे १० टक्के दहा टक्के कमी करण्यासाठी मान्यता देण्यात आली. यामुळे एक हजार स्वे.फु. चा गाळा घेणाऱ्या उद्योजकाचा कमीतकमी ४ लाख रुपये तर जास्तीत जास्त ५ लाखाचा रुपयाचा फायदा होणार असल्याचे पेशकार यांनी सांगितले.
या निर्णयाचे उद्योग मित्र संस्थेच्या वतीने उद्योग मंत्री सुभाष देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी अनबालगन ,तसेच संबंधित अधिकारी व नाशिक विभागीय अधिकारी नितीन गवळी यांचे आभार व्यक्त करण्यात आले. या सर्व लढ्यात संजय गायकवाड, निळकंठ पगार, प्रवीण खलाने, नरेेंद्र बागडे, भगवान आरोटे,चंद्रकांत जाधव इत्यादी उद्योजकांचा मोठा सहभाग आहे. लवकरच नवीन दराने निविदा निघेल त्याला इच्छुक उद्योजकांनी प्रतिसाद द्यावा व कमी झालेल्या दराचा लाभ घ्यावा असे अवाहन पेशकार यांनी केले आहे.