मुंबई – शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर उद्या अँजिओप्लास्टी केली जाणार आहे. आज दुपारच्या सुमारास ते येथील लिलावती हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल होणार आहेत. गेल्या वर्षीही त्यांच्यावर याच हॉस्पिटलमध्ये अँजिओप्लास्टी शस्त्रक्रीया करण्यात आली होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांना पुन्हा त्रास होत आहे. त्यामुळे ते हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन अँजिओप्लास्टी शस्त्रक्रीया करुन घेणार आहेत. तशी माहिती त्यांनी दिली आहे.