– कांदा द्राक्ष निर्यातीसाठी बांगलादेशकरिता एक विशेष किसान रेल्वेची सुविधा मिळावी
– नांदगाव रेल्वे स्थानकावर रेल्वेला थांबा द्या
– तिरुपती व अजमेरला नाशिकहून विशेष रेल्वे सुरु करा
नवी दिल्ली – दिल्ली येथे सुरु असलेल्या संसदीय अधिवेशन दरम्यान खा.डॉ.भारती प्रवीण पवार यांनी अनुदानाच्या मागणीवर बोलण्याची संधी दिल्या बद्दल सभापतीचे आभार व्यक्त करत आपले मत मांडले. रेल्वे बजेट २०२१-२२ चे समर्थन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचे आभार व्यक्त केले शेतकऱ्यांसाठी किसान रेल्वेच्या माध्यामातून शेतीमालाच्या दळणवळणासाठी एक अतिशय उत्कृष्ट सुविधा उपलब्ध करून दिली आहे. रेल्वेने जाणाऱ्या शेतमालावर ५० टक्के अनुदान मिळत असल्याने शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळत आहे. असे बोलत खा.डॉ.भारती पवार यांनी पुन्हा एकदा केंद्रीय रेल्वेमंत्री गोयल यांचे आभार व्यक्त करत मध्य रेल्वेने सुरु असलेली मुंबई ते दिल्ली राजधानी एक्सप्रेस जी हप्त्यातून फक्त चार वेळा चालत होती ती आता दररोज चालत आहे. यामुळे नाशिकहून दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांना एक अतिशय उत्कृष्ठ सुविधा प्राप्त झाली आहे. संसदेच्या सभापती महोदयांच्या माध्यमातून केंद्रीय रेल्वेमंत्री महोदयांना खा.डॉ.भारती पवार यांनी विनंती केली की, दिंडोरी लोकसभा मतदार संघासह नाशिक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रतीचे द्राक्ष व कांद्याची बांगलादेशमध्ये निर्यात केली जाते. या धर्तीवर वेळोवेळी शेतकरी व व्यापाऱ्यांची मोठ्या प्रमावर मागणी होत आहे की, नाशिकहून बांगलादेशकरिता एक विशेष रेल्वेगाडी किंवा वॅगनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली तर शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळेल.
खा.डॉ.भारती पवार यांनी सभापती महोदयांना विनंती केली कि, नाशिक जिल्हयातील नांदगाव रेल्वे स्थानकावरून मुंबईला जाणारे प्रवासी व पासधारकांची संख्या जास्त प्रमाणात आहे. परंतु कोविड-१९ मुळे ज्या विशेष रेल्वे सुरु आहेत. त्यापैकी एकही रेल्वे नांदगाव स्थानकावर थांबत नाही. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात असुविधा होत आहे. त्यामुळे या समस्येचे लवकरात लवकर निराकरण करून प्रवाशांना दिलासा देण्याची विनंती मागणी करण्यात आली. त्याचप्रमाणे नाशिकहून मोठ्या प्रमाणात प्रवासी तिरुपती व अजमेरला दर्शनासाठी जात असतात. त्यांच्याकरिता नाशिक ते तिरुपती व नाशिक ते अजमेरसाठी विशेष रेल्वेची सुविधा प्रदान करण्यात येण्याची मागणी करण्यात आली. खा.डॉ.भारती पवार यांना सभापती महोदयांनी बोलण्याची संधी दिल्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले.