नवी दिल्ली – संसदेच्या कॅन्टीनमध्ये खासदारांना मिळणारी जेवणाची ३५ रुपयातील स्वस्त प्लेट आता मिळणार नाही. यावर मिळणारे अनुदान आता बंद करण्यात आले आहे. याबाबतची माहिती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिली आहे. या निर्णयामुळे ८ कोटीची बचत होणार आहे.
संसदेत इतक्या स्वस्त किंमतीत मिळणा-या जेवणावर नेहमी टीका होत होती. सोशल मीडियावरही याबाबत खिल्ली उडवली जात. या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले आहे. ही कॅन्टीन अगोदर उत्तर रेल्वे चालवत होते. आता ही जबाबादारी भारतीय पर्यटन विकास महामंडळाकडे जाणार आहे. येथे खासदारांना विनाअनुदान असलेले जेवण पूर्ण पैसे भरुन मिळणा आहे. संसदेचे बजेट अधिवेशन २९ जानेवारीला सुरु होणार आहे. त्याअगोदरच हा धक्का खासदारांना देण्यात आला.