नाशिक – कोरोनाच्या संकट काळात खासगी हॉस्पिटलमधील अव्वाच्या सव्वा बिले ही सुद्धा सर्वसामान्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. यासाठीच महापालिकेने यापूर्वी लेखापरिक्षकांची नियुक्ती केली आहे. तरीही बिलांच्या तक्रारी काही कमी झालेल्या नाहीत. यापार्श्वभूमीवर भरारी पथके आणि हेल्पलाईन सुरू करण्याचे महापालिकेने निश्चित केले आहे. त्याचे कामकाज कसे असणार आहे? तसेच कोरोनाची स्थिती आटोक्यात आणण्यासाठी महापालिका काय प्रयत्न करीत आहे? आगामी काळाचे नियोजन काय आहे? यासंदर्भात
महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती गणेश गिते यांची ही विशेष मुलाखत नक्की बघा