अक्षय कोठावदे, नाशिक
गेल्या काही दिवसांपासून खाद्य तेलाचे दर भडकले असून लीटरमागे किमान २० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे खाद्य तेलाचे दर ११० रुपयांचे पुढे गेल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.
कोरोनाच्या संकटात आता महागाईने तोंड वर केले की काय, अशी शंका सर्वसामान्यांना येत आहे. स्वयंपाकासाठी अत्यावश्यक असलेले खाद्य तेल सध्या महागले आहे. सोयाबीन व सर्यफूल तेलाचे बाजारभाव दिवसेंदिवस उसळी घेत आहेत. गेल्या काही दिवसात खाद्य तेलाचे दर लीटरमागे किमान २० रुपयांनी वाढले आहेत.
तेलाचे दर असे
सोयाबीन तेल – १ महिन्यापूर्वीचे दर १४७० ते १४८० रुपये – सध्याचे दर १५८० ते १६१० रुपये (१५ किलो)
सूर्यफूल तेल – १ महिन्यापूर्वीचे दर १५३० ते १५६० रुपये – सध्याचे दर १८८० ते १९१० रुपये (१५ किलो)
सुटे तेल – १ महिन्यापूर्वी ८८ ते ९२ रुपये – सध्याचे दर १०८ ते ११५ रुपये (१ किलो)
प्रतिक्रीया
कोरोनाच्या महामारीत आता खाद्य केलाचे दर भडकले आहेत. या दरांवर कुणाचेच कसे नियंत्रण नाही. सरकारने त्वरीत दर कमी करावेत.
– आम्रपाली बागुल, गृहिणी.
—
खाद्यतेलाची सतत होणारी भाववाढ आणि घसरण याचे नेमके काय कारण आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. शासनाने खाद्यतेलाचे भाव नियंत्रणात आणावेत. त्यामुळे तेलाचे भाव स्थिर राहण्यास मदत होईल.
-प्रकाश ठक्कर, खाद्य तेलाचे होलसेल विक्रेते, नाशिक रोड
—
सतत होणाऱ्या भाववाढीमुळे सर्वसामान्य ग्राहक आणि किरकोळ विक्रेत्यांनाही त्रास होतो आहे. सरकारनेच याची दखल घ्यावी.
– मुकुंद भडांगे, किरकोळ विक्रेते
सध्या व्यापारी नी दुकानदार प्रत्येक वस्तूचा काळा बाजार करता आहे त्यावर महाराष्ट्र सरकार ने मनापासून विचार केला पाहिजे