निलेश गौतम, सटाणा
एकीकडे कोरोनाने थैमान घातले असून सर्वसामान्य नागरिकांच्या हातात रोजगार नसतांना जीवनावश्यक वस्तुत गणले जाणारे खाद्यतेल (गोडेतेल) चे दर मात्र गगनाला भिडल्याने सर्व सामान्य जनतेच्या स्वयंपाक घरातील बजेट मात्र बिघडलेआहे. एक किलो खाद्यतेलासाठी दर १५० च्या वर भिडल्याने सर्वच स्तरातून या भाववाढीच्या तक्रारी होऊ लागल्या आहेत.
स्वयंपाक घरात रोजच लागणाऱ्या किराणा माला पैकी शेंगदाणे, खाद्यतेल व दाळीचें भाव गगनाला भिडले आहेत. सर्वसाधारण कुटुंबाचे महिन्याचे आर्थिक बजेट या मुळे पुरते कोलमडले असुन कोरोनाने अनेकांचे रोजगार गेले आहेत तर अनेक हाताना काम नसल्याने घर चालविणे अवघड झाले आहे. किरकोळ मजुरीचे दर ही मोठ्या प्रमाणात वाढल्याने इतर उद्योग धंद्यासह शेती व्यवसायला ही याचा फटका बसत आहे. सध्या शेत मजुरीचे दर महिलांसाठी ३०० तर पुरुषांना ३५० रुपये दर देऊन ही मजूर मिळत नाही. सगळीकडे महागाईच्या नावाने ओरड केली जात आहे. मार्च एप्रिल ,महिने हे हिंदू वर्षातील सर्वाधिक सणावळीचे असल्याने हे सण साजरे करतांना सर्व सामान्य कुटुंबांना ऋण काढून सण साजरा करण्याची वेळ येऊ नये अशीच काहीशी परिस्थिती सर्व सामान्य कुटुंबाची झाली आहे.
खाद्यतेलाचे प्रकार
शेंगदाणा तेल- १७०
सोयाबीन तेल- १४०
सूर्यफूल तेल- १८०
रिफाईन तेल- १२५
(रुपये प्रति लीटर)
……
लहान मुलांच्या पोषण आहारातून खाद्यतेल गायब..
राज्याच्या महिला व बालविकास खात्याकडून अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून पोषण आहाराचे वाटप ० ते ६ वर्ष वयोगटातील बालकांना केले जाते. या मधे चना, मसूर दाळ, गहू, तिखट, मीठ, हळद, सह अर्धा किलो खाद्यतेल दिले जाते. मात्र खाद्यतेलाचे दर गगणाला भिडताच पोषण आहार पुरवठा दाराकडून खाद्यतेल बंद करून साखरेचे वाटप करण्यात आल्याची माहिती लाभार्थी कुटुंबीयांनी दिली आहे.
…..
खाद्यतेलाचे दर अजुन वाढण्याची शक्यता
किराणा मालाचे दर रोजच वाढत आहेत श्रीमंतापासून गरिबांची मागणी किराणा मालाला असते खाद्यतेलाचे दर अजुन वाढण्याची शक्यता आहे तर।डाळी ही मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत.
भूषण भदाणे, किराणा व्यापारी
…..
खाद्यतेल ही रेशनच्या माध्यमातून पुरवावे
खाद्यतेलासह किराणा मालाचे दर अशेंच वाढत राहिले तर मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबीयांनी जगायचे कसे २०० ते २५० रुपये रोजाने रोजंदारी काम करून घर चालविताना मोठी कसरत करावी लागते सरकारने गरिबांना गहू तांदूळ सोबत खाद्यतेल ही रेशनच्या माध्यमातून पुरवावे
सौ वर्षा पवार, शेतमजूर , गृहिणी