नाशिक – खाकी वर्दीतील माणूसकी वेगवेगळ्या निमित्ताने समोर येत असते. कोरोना काळातही ती दिसली. पण, गुरुवारी रात्रीची गस्त घालणा-या पोलिसांनी एका गरोदर महिलेला पोलिसांनी रुग्णालयात जाण्यासाठी थेट वाहन उपलब्ध करुन दिले. त्यामुळे तीची प्रसूती सुखरुप झाली.
गंगापूर गाव येथील गरोदर महिला भारती उत्तम जाधव (२३) ही रात्री ३ वाजता तिचे आजी सासु व सासरे बरोबर रुग्णालयात पायी जात होती. हे गस्त घालणा-या पोलिसांना दिसले. या महिलेला प्रसूती कळा येत होत्या. पोलिसांनी नियंत्रण कक्षात संपर्क साधला. त्यानंतर गुन्हे शोध पथकाचे वाहन आले. या वाहनाने जाधव या नोंदणी असलेल्या गिरणाेर ग्रामीण रुग्णालयात दाखल झाल्या. वेळेत रुग्णलायात पोहचल्यामुळे प्रसूती सुखरुप झाली.