लंडन – संपूर्ण जगाला चिंतेत टाकणारे एक वृत्त आहे. काही दिवसांपूर्वीच ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार समोर आल्यानंतर आता आणखी एख खळबळजनक बाब समोर आली आहे. कोरोनाचा आणखी एख धोकादायक नवा प्रकार समोर आला आहे. हा विषाणू दक्षिण अफ्रिकेतून आल्याचे सांगितले जात आहे.
कोरोना व्हायरसच्या तुलनेत ७० टक्के वेगाने पसरलेला कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे ब्रिटनमधील नागरिक भयभीत झाले असून नवीन आणि बदललेल्या या विषाणू प्रकाराच्या तोंड देण्यासाठी ब्रिटनचे संशोधक आणि शास्त्रज्ञ झुंजत आहे.
या संदर्भात आरोग्य हॅनकॉक म्हणाले की, आता या विषाणूचे नवीन रूप प्रथम दाक्षिण आफ्रिकेत सापडले असून तेथून तो ब्रिटनमध्ये आलेल्या दोन प्रवाशांमुळे आला ते विषाणू अधिक संसर्गजन्य असून पूर्वी विषाणूपेक्षा जास्त वेगाने बदलतात. त्यामुळे बाधित लोकांच्या संपर्कात आलेल्या लोकांना वेगळे ठेवण्यात येत आहे. गेल्या १५ दिवसांत दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या लोकांना इतरांपासून स्वत: ला अलग ठेवण्यास सांगितले आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेतून येथे येण्यावर त्वरित बंदी घातली आहे, असेही ते म्हणाले.
नवीन निर्बंधांची त्वरित अंमलबजावणी :
ब्रिटनच्या अनेक भागात नवीन विषाणूचा प्रसार झाल्यावर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. गृहनिर्माण सचिव रॉबर्ट जेनेरिक म्हणाले की, लवकरच पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्या अध्यक्षतेखालील सरकारच्या कोरोना ऑपरेशन समितीची बैठक आयोजित केली जाईल आणि सध्याचे निर्बंध पुरेसे आहेत की आणखी भागातही वाढविण्यात यावेत याचा निर्णय घेतला जाईल. तसेच त्याची त्वरीत अंमलबजावणी केली जाईल.
फ्रान्समध्ये मालवाहू वाहनांसाठी मर्यादा
ब्रिटन, फ्रान्स आणि युरोपियन युनियनच्या अधिकाऱ्यांमध्ये दोन दिवस चर्चा झाल्यानंतर फ्रान्सने मालवाहतूक वाहनांसाठी आपल्या सीमारेषा उघडण्यास सहमती दर्शविली आहे. तथापि, जो वाहक ट्रकसह फ्रेंच सीमेवर प्रवेश करतो त्याने प्रथम कोरोना चाचणी केली पाहिजे, अशी मर्यादा घातली आहे. नवीन विषाणूला देशात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी फ्रान्सने ब्रिटनहून भाड्याने घेतलेल्या वाहनांना येण्यास बंदी घातली होती. यामुळे फ्रान्सला जाण्यासाठी ब्रिटन सीमेवर 1500 हून अधिक ट्रक उभे राहिले आहेत.
इस्त्राईलमध्ये चौघे प्रवासी बाधित
या देशात ब्रिटनमध्ये पसरलेल्या कोरोना विषाणूच्या नव्या विषाणूचा चार जणांना संसर्ग झाल्याचे आढळले आहे. यातील तीन जण इंग्लंडहून परत आले. चौथ्या रुग्णाची तपास चाचणी सुरू आहे.
स्वित्झर्लंडमध्ये लसीकरण
युरोपातील सध्या अत्यंत बर्फाळ असणाऱ्या स्वित्झर्लंड या देशात लसीकरण सुरू झाले आहे. पहिली लस 90 वर्षांच्या महिलेला दिली गेली. तर दुसरीकडे जर्मनमध्ये कोरोनामुळे एका दिवसात 962 लोक मरण पावले, असल्याचे सांगण्यात येते.