नवी दिल्ली – सर्व जगभरात कोरोनाचा फैलाव कमी- जास्त होत असतानाच ब्रिटनमध्ये कोरोनापेक्षाही नव्या भंयकर विषाणूमुळे खळबळ उडाली आहे, त्यामुळे भारतातील आरोग्य मंत्रालयाच्या तातडीच्या बैठकीत इतर देशांनी उड्डाणांवर बंदी घातली आहे. त्यामुळेच संयुक्त देखरेख समुहाची तातडीची बैठक आज होणार आहे.
ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा बदललेला धोकादायक प्रकार समोर आला आहे. त्याचे संक्रमण वेगाने पसरत आहे. भारतातील आरोग्य मंत्रालयाने व्हायरसच्या या नव्या स्वरूपावर चर्चा करण्यासाठी आज सोमवारी त्याच्या संयुक्त देखरेख समूहाची (जेएमजी) तातडीची बैठक बोलावली असून या बैठकीचे प्रमुख आरोग्य सेवा महासंचालक असतील. भारतातील जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ. रॉडेरिको एच. ओ. फ्रिन देखील या बैठकीस उपस्थित राहू शकतात. विशेष म्हणजे डॉ. रॉडेरिको एच. ओफ्रिन हे जॉइंट मॉनिटरिंग ग्रुपचे सदस्य आहेत,
अनेक देशांची विमान उड्डाणे बंद
भितीदायक बाब म्हणजे नवीन विषाणू यूकेमध्ये झपाट्याने पसरत आहे. त्यामुळेच कालच्या रविवारपासून लंडन आणि अन्य काही भागात कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. यामुळे पुन्हा एकदा कोट्यवधी लोकांना घरामध्येच राहावे लागणार आहे. एवढेच नव्हे तर अनावश्यक वस्तूंची दुकाने व आस्थापनेही बंद ठेवण्यात आली आहेत.
अनेक युरोपीयन व आशियन देश उड्डाणे घेण्यास बंदी घालत आहेत.
आधीच्या विषाणूपेक्षा 70 टक्के वेगाने पसरतो
नवीन प्रकारचे कोरोना विषाणू हा संसर्ग देशात वेगाने पसरवण्यासाठी अनेक गोष्टींना जबाबदार असल्याचे मानले जाते. ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी असे म्हटले आहे की, जगामध्ये कोरोना विषाणूचे एक नवीन रूप समोर आले आहे जे आधीच्या विषाणूपेक्षा 70 टक्के वेगाने पसरते. कोरोनाच्या या नव्या प्रकाराची भीती अनेक युरोपियन देशांना आहे.
व्हायरसला व्हीयूआय 2020/12/01 असे नाव दिले
नेदरलँड्सने म्हटले आहे की, उद्रेक त्याच्या मर्यादेपर्यंत जाऊ नये म्हणून त्यांनी ब्रिटनहून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. शास्त्रज्ञांनी देखील या नवीन प्रकारचा कोरोना अभ्यास करण्यास सुरवात केली असून कोरोना लाटेशी नवीन विषाणूचा संबंध जोडला जात नाही. त्यामुळे वैज्ञानिकांनी या नवीन प्रकारच्या व्हायरसचे नाव ‘व्हीयूआय 2020/12/01’ ठेवले आहे.
ख्रिसमस (नाताळ) कार्यक्रम रद्द:
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन म्हणाले की, नवीन कडक निर्बंधाखाली प्रस्तावित पाच दिवसांचा ख्रिसमस बबल कार्यक्रमही रद्द करण्यात येईल. यापूर्वी ख्रिसमसच्या कार्यक्रमांवर निर्बंध कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता पंतप्रधान जॉनसन यांनी निर्बंध अधिक कडक केले आहेत. दक्षिण इंग्लंडमधील बर्याच भागांवर कठोर बंदी घातली आहे.
जागतिक आरोग्य संघटना सतर्क
यूकेमध्ये लॉकडाउन भागातील लोकांना त्यांच्या घराबाहेर इतर कोणालाही भेटण्यास मनाई आहे. ख्रिसमसच्या काळातही ही बंदी लागू होईल. त्याचवेळी इंग्लंडचे मुख्य वैद्यकीय अधिकारी प्रोफेसर ख्रिस विट्टी म्हणाले की, कोरोनाच्या नवीन प्रकराबद्दल जागतिक आरोग्य संघटनेलाही सतर्क केले गेले आहे. आता नव्या प्रकारच्या व्हायरसविषयी अधिक माहिती संकलित केली जात आहे.