पिंपळनेर (ता. साक्री) – येथील दोन कृषी साहित्य दुकाने फोडणाऱ्या चोराला पिंपळनेर पोलिसांनी गजाआड केले आहे. या चोरास न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने शिवनेरी ऍग्रो एजन्सी तसेच दुर्ग कृषी भांडार या दुकानाचे कुलूप तोडले. तसेच, दुकानातून रोख रक्कम व कांद्याचे ४८ किलो बियाणे वेगवेगळ्या कंपनीचे चोरी केले. यासंदर्भात दुकानदारांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक आर बी केदार यांनी केला. त्यानुसार संशयित आरोपी भिका सदु भोई (वय ४५, रा. लोंढानाका पो. अकलाड ता. जि. धुळे) यास बियाणे विक्री करताना अटक करण्यात आली.
पोलीस अधिक्षक चिन्मय पंडित, अप्पर पोलीस अधिक्षक राजू भुजबळ, पोलीस नाईक चेतन सोनवणे, देवेंद्र वेंदे, सुनील साळुंखे, पोलीस कॉन्स्टेबल भूषण वाघ, रवींद्र सूर्यवंशी, पंकज वाघ, रवीकुमार राठोड, विशाल मोहने यांनी तपास करुन चोरास अटक केली.