दिंडोरी – नाशिक-दिंडोरी रस्त्यावर खतवड फाटा येथे दोन मोटारसायकलची अपघात होऊन दोघे ठार झालेत तर तीन जखमी झाले. नाशिक येथून दिंडोरी येथे मोटारसायकलस्वार येत होते. तर सटाणा येथुन येणारे जोडपे मोटारसायकलवरुन नाशिकला जात होते. दोन्ही मोटारसायकलची समोरासमोर धडक झाल्याने या अपघातात सोमनाथ गाढवे (२२, रा.कोळीवाडा, सटाणा) हे जागेवरच ठार झाले. तर मोटारसायलवर त्यांच्या मागे बसलेल्या सुमन गोरख गाढवे या जखमी झाल्या. त्यांना नाशिक शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुसर्या मोटारसायकलवर असलेल्या ताज चिराग मदारी (रा. सुरगाणा) व शाहरुख मदारी रा.दिंडोरी या दोघांना नाशिक शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. त्यात ताज चिराग मदारीचे उपचार सुरु असताना निधन झाले. शाहरुख मदारीवर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी दिंडोरी पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.