मुंबई – भाजपचे नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या गेल्या काही दिवसाच्या चर्चेने पुन्हा जोर पकडला आहे. खडसे हे मुंबईत दाखल झाल्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत चर्चेला उधान आले आहे. ते आज राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे बोलले जात आहे. पण, त्याबाबत दोन्ही बाजूने गुप्तता पाळली जात आहे. काही दिवसापूर्वी पद मिळेल तेव्हा बघू असे वक्तव्य असलेली संभाषणाची क्लिप समोर आली होती. त्यामुळे आता राष्ट्रवादीत ते प्रवेश करतात का, त्यांना कोणते पद राष्ट्रवादी देईल याबाबतही चर्चा रंगली आहे.