मुंबई – भाजपचे मातब्बर नेते एकनाथराव खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज स्वागत केले आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेत असल्याची अधिकृत घोषणा आज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. यानंतर मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर असणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथराव खडसे यांच्या प्रवेशाबद्दल विचारणा केली असता त्यांनी आपण खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाचे स्वागत करत असल्याचे सांगितले. महाविकास आघाडीच्या विशाल कुटुंबांमध्ये एकनाथराव खडसे यांच्यासारखे नेते येत असतील तर ती चांगली बाब असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.