जळगाव – भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिल्याच्या वृत्तामुळे एकच खळबळ निर्माण झाली. दरम्यान खडसे यांच्या कन्या व जिल्हा बँकेच्या चेअरमन रोहिणी खडसे यांनी या वृत्ताचा इन्कार केला आहे. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सुध्दा खडसे यांनी सदस्यपदाचा राजीनामा दिला नसल्याचे सांगितले आहे.
खडसे हे गुरुवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. पण, त्याअगोदर त्यांच्याबाबत विविध वृत्त प्रसिध्द होत आहे. राष्ट्रवादीने त्यांना कृषीमंत्री पदावर वर्णी लावण्याचे निश्चित केल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे भाजपने त्यांना गोव्याचे राज्यपाल देण्याचे निश्चित केल्याची चर्चा आहे. त्यामुळे खडसे मंत्रीपद घेतात की राज्यपाल पद घेऊन राजकारणाचा संन्यास घेतात. यावरही सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.