वॉशिंग्टन – खगोलशास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय पथकाने तीन मोठ्या ग्रहांचा शोध लावला आहे. हे ग्रह पृथ्वीपेक्षा मोठे आहेत. आणि सूर्यासारख्या ताऱ्याला प्रदक्षिणा घालतात. याला टीओआय ४५१ किंवा जी टाईप स्टार म्हणून ओळखले जाते. तर याच्याभोवती फिरणाऱ्या या तीन ग्रहांना टीओआय ४५१ सिस्टीम म्हणून ओळखले जाते.
नुकत्याच शोधण्यात आलेल्या मीन एरिडेनस स्ट्रीममध्ये त्यांचा सहभाग आहे. ही आकाशगंगा अवकाशातील एक तृतीयांश भागात पसरलेली आहे. नासाच्या ट्रान्सिटिंग एक्सोप्लॅनेट सर्व्हे सॅटेलाईटतर्फे २०१८ मध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान काढण्यात आलेल्या एका फोटोच्या सहाय्याने खगोलतज्ञांनी या नव्या सिस्टीमचा शोध लावला आहे. अस्ट्रॉनॉमिकल जर्नलमध्ये याची माहिती देण्यात आली आहे. यामुळे विकसित होत जाणाऱ्या ग्रह समूहाबद्दल माहिती मिळणे सोपं होईल.
सहाय्यक प्रोफेसर न्यूटन यांच्या मते हे तिन्ही ग्रह पृथ्वीपेक्षा दोन ते चारपट मोठे आहेत. यामुळेच शास्त्रज्ञांना ग्रहांचा विकास कसा होतो, याचा अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे. हा ग्रह आपल्या ताऱ्याची २ ते १६ दिवसांत प्रदक्षिणा पूर्ण करतो. भारतापासून हे ग्रह ४०० प्रकाश वर्ष दूर आहेत. तसेच, हे ग्रह १२ कोटी वर्ष जुने असल्याचे खगोलशास्त्रज्ञ एलिजाबेथ न्यूटन यांनी सांगितले आहे.
टीओआय ४५१ ला सीडी-३ १४६७ च्या नावाने ओळखले जाते. हा सूर्यापेक्षा १२ पटीने लहान आणि थंड आहे. सूर्याच्या तुलनेत हा तर ३५ पट कमी उष्णता उत्सर्जित करतो. तर सूर्यापेक्षा पाच पट वेगाने फिरतो.