देवळाली कॅम्प – येथील खंडेराव टेकडीवर चंपाषष्ठी निमित्त होणारा यात्रोत्सव केवळ धार्मिक पूजाविधी पार पाडत करोनाच्या पार्श्वभुमीवर भाविकांविना पार पडला. गेल्या अनेक वर्षात पहिल्यांदाच येथील खंडेराव टेकडीवर होणारा यात्रोत्सव करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाणे साजरा करण्यात आला.यावेळी महाआरतीसाठी उपस्थित असलेले खासदार हेमंत गोडसे यांनी ‘ हा करोनाचे संकट टळू दे ‘ असा नवस करत भाविकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले. मंदिराचे पुजारी आमले परिवाराच्या वतीने कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष सचिन ठाकरे,प्रकाश आमले, सचिन आमले,अथर्व आमले, नितीन आमले, सतीश म्हस्के, नरेंद्र गायकवाड आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी ७ वाजता साप्तमिक पूजा व महाअभिषेक करण्यात आला. त्यानंतर महाआरती खासदार हेमंत गोडसे, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष दिनकर पाळदे, अण्णाज टेम्पल हिल ग्रुपचे नागेश देवाडिगा, रमेश गायकर, संजय भालेराव, परमजितसिंग कोचर,दीपक बलकवडे, संग्राम करंजकर, धीरज मांडे,रामनिवास सारडा,सुरेश शेटे, संजय आढाव, भगवान शिंदे, लक्ष्मीधर डेश, संजय माथुर, संजय भुतडा, दत्ता सुजगुरे, संजय गोडसे, राजू चौधरी,शरद गोडसे, भगवान शिंदे, राजू पगारे, अनिल पाळदे, संतोष घोडे, मनोज ठाकरे आदींसह टेम्पल हिल ग्रुपचे सदस्य उपस्थित होते. दरम्यान दुपारी बारा वाजेच्या सुमारास भगूर येथून आमले परिवाराच्या वतीने पालखी व मानाची काठी मिरवणूक न काढता केवळ भेट देण्यासाठी आणण्यात आली होती. सांयकाळी बारा गाडा ओढण्याचा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याने खंडेराव भक्त उत्तम मांडे यांच्या हस्ते केवळ एका बैलगाडीचे पूजन करण्यात येणार आहे यावेळी भाविकांनी गर्दी न करण्याचे आवाहन विश्वस्ताच्या वतीने करण्यात आले आहे.टेकडी परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असून भाविकांना खालूनच टेकडीवर प्रवेश दिला जात नसल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली.