मुंबई – आपल्याजवळ रोख पैसे नसतील तर आपल्याला क्रेडीट कार्ड उपयोगी पडतं. ज्या तारखेपर्यंत पैसे परत करायचे आहे तोपर्यंत कुठलेही व्याज बँकेच्या वतीने लावले जात नाही, मात्र त्यापेक्षा जास्त दिवस पैसे भरायला लावले तर व्याज सुरू होत असते. त्यामुळे नेहमी वेळेवर क्रेडीट कार्डचे बील भरायला हवे. त्यातही अशक्य वाटत असेल तर काही महिन्यांसाठी इएमआयचा पर्याय आपण निवडू शकता. या सुविधेचा लाभ वेगवेगळ्या पद्धतीने उचलता येतो.
वेळेवर पैसे भरले नाहीत तर मोठा भुर्दंड बसण्याची शक्यता असते. कार्डवरील उपलब्ध सुविधा आणि दुकानदार यांच्यानुसार इएमआयचा कालावधी ३ ते ६० महिन्यांपर्यंत निश्चित होत असते. इएमआयच्या प्रकारावरही कालावधी अवलंबून असतो.
मोठा कालावधी निवडला तर इएमआय कमी पडतो आणि वेळही मिळतो. त्यामुळे एखादी वस्तू खरेदी करायची असेल किंवा हॉस्पिटलचे बील द्यायचे असेल तर ही सुविधा देवासारखी धावून येते, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
हल्ली अनेक स्टोअर, व्यापारी आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म क्रेडीट कार्डच्या माध्यमातून खरेदी करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवांवर इएमआयची सुविधा देत आहे. हा पर्याय बँक आणि क्रेडीट कार्ड देणाऱ्या कंपनीतील करारावर अवलंबून असते. इएमआयचा कालावधी आणि व्याजदर या करारावरच ठरतो.
नो कॉस्ट इएमआय स्कीम
नो-कॉस्ट EMI स्कीम खरे तर मर्चंट EMI चा एक व्हेरियंट आहे. नो-कॉस्ट EMI सामान्य समान मासिक हप्त्याप्रमाणे आहे. अश्या स्कीममध्ये वस्तू खरेदी केल्यानंतर आपल्याला व्याज द्यावे लागते.