गुरूवार, ऑगस्ट 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

क्रेडाई दोन दिवशीय राष्ट्रीय शिखर परिषदेला मान्यवरांच्या उपस्थितीत सुरुवात

by Gautam Sancheti
जानेवारी 29, 2021 | 12:54 pm
in स्थानिक बातम्या
0
20210129 183017

  • बांधकाम व्यवसायिकांना नेतृत्व गुण आवश्यक – क्रेडाई राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मगर यांचे मत  
  • आगामी काळात शहरीकरणाचा वेग वाढणार : महेश झगडे
  • …..

 नाशिक : समाजात बांधकाम व्यवसायिक म्हणून काम करतांना नेतृत्व करण्याचा गुण आवश्यक असून यासाठी कायमच शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवायला हवा असे मत क्रेडाई राष्ट्रीय अध्यक्ष आणि मगरपट्टा टाऊनशिपचे डेव्हलपमेंट आणि कन्स्ट्रक्शनचे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सतीश मगर यांनी व्यक्त केले आहे. क्रेडाई महाराष्ट्रकडून आयोजित करण्यात आलेल्या क्रेडाई राष्ट्रीय शिखर परिषद २०२१च्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

यावेळी क्रेडाई राष्ट्रीय उपाध्यक्ष शांतीलाल कटारिया, क्रेडाई महाराष्ट्र सचिव सुनील कोतवाल, रुस्तमजी ग्रुपचे बोमन ईरानी, क्रेडाई राष्ट्रीय सल्लागार समितीचे अध्यक्ष जितेंद्र ठक्कर, क्रेडाई राष्ट्रीय सल्लागार समितीचे खजिनदार अनंत राजेगावकर, क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष राजीव पारीख, सुरेश अण्णापाटील, उमेश वानखेडे, आदी मान्यवर उपस्थित होते.

क्रेडाईने महाराष्ट्रकडून शहरातील कोर्टयार्ड मॅरियेट येथे दोन दिवसीय राष्ट्रीय शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी बोलतांना मगर यांनी सांगितले की, व्यवसायात यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत आवश्यक आहे पण त्यासोबतच उत्तम प्रकारे नियोजन हवे, कामाचा फोकस हवा जेणेकरून योग्य दिशेने पाऊले पडतील. याशिवाय एकमेकांना सहकार्य करणेही आवश्यक आहे. आगामी काळात खूप मोठे आव्हाने उभी आहेत. यात आर्थिक नियोजनाबरोबरच  कोरोनासारखे अतिशय वेगळे आणि गंभीर संकट देखील आहे. याचा स्वतंत्रपणे विचार करायला हवा. यावेळी त्यांनी यशस्वीपणे नेतृत्व करण्यासाठी १० सूत्रे देखील सांगितली.

 

आगामी काळात शहरीकरणाचा वेग वाढणार : महेश झगडे

उद्घाटन सोहळ्यानंतर निवृत्त सनदी अधिकारी महेश झगडे यानी परिषदेला मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, बांधकाम व्यवसाय हा पुढे आव्हानात्मक होणार आहे. मोठ्या प्रमाणात शहरीकरण होणार आहे.त्यामुळे मोठा व्यवसाय संधी निर्माण होयील. जशी लोकसंख्या वाढते आहे आणि या शतकात लोकसख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे. त्यामुळे  नागरिक मोठ्या संख्येने शहरात राहायला येणार आहे. शहरीकरण जोरात होणार आहे. तर तर दुसरीकडे  भांडवलदार हे सध्यां  जग चालवत आहेत. त्यामुळे आर्थिक नियोजन करावे लागेल. कोविड नंतर आता तर  जग खूप बदललय आहे. क्रेडाईसारख्या असोसिएशनने सरकारवर दबाव आणून चुकीच्या गोष्टी थांबवल्या पाहिजे. शहरात योग्य सोयी निर्माण होणे गरजेच आहे.

या परिषदेच्या यशस्वीतेसाठी क्रेडाई नाशिकचे अध्यक्ष रवी महाजन, गौरव ठक्कर, अनिल आहेर, सागर शहा, विजय चव्हाणके, कुणाल पाटील, सचिन बागड, राजेश आहेर, नरेंद्र कुलकर्णी, अतुल शिंदे, अनंत ठाकरे, हंसराज देशमुख यांनी परिषदेच्या यशस्वितेसाठी मेहनत घेतली आहे.

वर्षभर केलेल्या कामांचा आढावा

यावेळी क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष राजीव पारीख यांनी क्रेडाई महाराष्ट्रने वर्षभर केलेल्या कामांचा आढावा सादर केला. यामध्ये कोविड काळात केलेल्या कामे, वेगेवेगळ्या कार्यशाळा आदींची माहिती दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व सभासदांनी प्रतिज्ञा घेतली. त्यानंतर क्रेडाईला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सर्व माजी अध्यक्षाचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात सुनील कोतवाल यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

देवळाली कॅम्प – भूमिगत गटारीचे पाणी रस्त्यावर, परिसरात दुर्गंधी

Next Post

चांदवडला रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद, मोफत नेत्रदान शिबिरही संपन्न

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
IMG 20210129 WA0022

चांदवडला रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद, मोफत नेत्रदान शिबिरही संपन्न

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी घरामध्ये वादाचे प्रसंग टाळलेले बरे, जाणून घ्या, गुरुवार, २१ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 20, 2025
IMG 20250820 WA0386

नाशिक जिल्हा परिषद पंचायत विकास निर्देशांकात राज्यात अव्वल…यांच्या हस्ते होणार गौरव

ऑगस्ट 20, 2025
election 1

राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या…सहकार विभागाने घेतला हा निर्णय

ऑगस्ट 20, 2025
fda1

अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई…मिठाईचा २४ हजाराचा साठा जप्त

ऑगस्ट 20, 2025
प्रातिनिधिक फोटो

कारमधून आलेल्या नागासाधूने संमोहन करुन व्यावसायीकास लुटले, रोकडसह हातातील सोन्याची अंगठी केली लंपास

ऑगस्ट 20, 2025
Sale KV Static blue 1x1 copy 1 e1755691438850

फ्लिपकार्टवर पोको एम७ प्‍लस ५जीच्‍या विक्रीला सुरूवात…ही आहे किंमत

ऑगस्ट 20, 2025
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011