रविवार पेठेत दोन गटात हाणामारी
नाशिक : भिंत पाडण्याच्या कारणावरून रविवार पेठेत शनिवारी (दि.१०) दोन गटात हाणामारी होऊन यात दोन महिलांचा विनयभंग करण्यात आल्याच्या परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. पहिल्या तक्रारीनुसार चंद्रशेखर नवले, बाळासाहेब पगारे, विवेक तुरे, भारती नारखेडे अशी माहराण व विनयभं करणार्या संशयितांची नावे आहेत.
संशयित पीडितेच्या घराशेजारील भिंत पाडत असताना त्यांच्या घरात माती पडत होती हे सांगण्यास पिडीता गेल्या असता संशयितांनी त्यांना मारहाण करत कपडे फाडून विनयभंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दुसर्या तक्रारीत पिडीतने दिलेल्या तक्रारीनुसार ओमकार नवले, दिपाली नवेले अशी संशयितांची नावे आहेत.संशयितांनी किरकोळ काराणातून अश्लिल शिवीगाळ करत पिडेतेला मारहाण केली. तसेच ओमकार याने पिडीतेचा विनयभंग केल्याचे म्हटले आहे. या दोन्ही प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
……
मंदिरातून श्री यंत्राची चोरी
नाशिक : महामार्गावरील हॉटेल ज्युपीटरच्या आवारातील मंदिरात घुसून चोरट्यांनी १५ हजार रूपये किंमतीचे श्रीयंत्र चोरट्यांनी पळवल्याची घटना शुक्रवारी (दि.९) मध्यरात्री घडली. याप्रकरणी योगेश पोपट इंगळे (रा. कमोदनगर, पंचवटी) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार शनिवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी संरक्षक भिंतीवरून उडी मारून हॉटेलच्या आवारात असलेल्या देवी मंदिरातून १५ हजार रूपये किंमतीचे श्री यंत्र चोरून नेले. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार भोजने करत आहेत.
…….
ऑनलाईन ४८ हजार लंपास
नाशिक : बक्षिस मिळाल्याची बतावणी करून बँकेचे एटीएम कार्ड व खात्याची माहिती घेऊन ऑनलाईन एकाचे ४७ हजार ७९३ रूपये भामट्यांनी लंपास केल्याचा प्रकार शनिवारी (दि.९) सकाळी विहितगाव परिसरात घडला.
याप्रकरणी भाविक नामदेव वराडे (रा. मथुरारोड, विहितगाव) याने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार भाविक यास शनिवारी सकाळी मोबाईलवरून अज्ञात व्यक्तीचा फोन आला. आपणास बक्षिस लागल्याची बतावणी करून ऑनलाईन पैसे खात्यावर भरण्यासाठी म्हणून वराडे यांच्या बँक खाते व एटीएम कार्डची माहिती घेतली. यानंतर काही वेळातच बँक खात्यातील ४७ हजार ७९३ रूपयांची रोकड लंपास झाली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्याननुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुनिल रोहकले करत आहेत.
……
शेतीच्या वादातून मारहाण
नाशिक : शेतीच्या वादातून तघांनी ट्रक्टर चालकास बेदम मारहाण केल्याचा प्रकार तालुक्यातील तिरडशेत येथे शनिवारी (दि.१०) सकाळी घडली. हरी पेढेकर, देवराम पेढेकर, चितामणी काळू बोडके अशी मारहाण करणार्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी देविदास पवार यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पवार हे त्यांच्या गट नंबर २० येथील शेतीची गोरख पोपट माळी यांच्या ट्रॅक्टरने मशागत करत होते. यावेळी संशयित तेथे येऊन त्यांनी लोखंडी रॉड तसेच लाकडी दांडक्यांनी ट्रक्टरचालक माळी यांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
………
तलवारीने केक कापणारांवर गुन्हा
नाशिक : लेखानगरच्या इंदिरानगर वसाहतीत शुक्रवारी (दि.९)तलवारीने केक कापून भाईंचा वाढदिवस साजरा करणार्या ६ जणांच्या टोळक्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राजु चव्हाण (रा. पेठरोड), रिझवान शेख (इंदिरागांधी वसाहत, लेखानगर), गणेश शेजवळ, इम्राण पठाण, अमोल वाकळ, सचिन आठवले रा. लेखानगर अशी संशयितांची नावे आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार इंदिरानगर वसाहत क्रमांक २ येथील शौचालयासमोरील बाकावर संशयितांनी एकाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी केक आणून तो तलवारीने कापला. या सर्वांवर अंबड पोलीस ठाण्यात जमावबंदी, अवैध शस्त्र बाळगणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
…….
एकाची आत्महत्या
नाशिक : एसटी कर्मचार्याच्या घरी मित्राने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आडगावच्या रामनगर शिवारात शनिवारी ( दि.१०) सकाळी उघडकीस आली. अशोक आनंदराव ताडकुल (३०, रा. रामनगर, आडगाव) असे आत्महत्या करणार्याचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी नितीन प्रभाकर गवळी (रा. रामनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार ताडकुल याने गवळी यांच्या राहत्या घरात छतास असलेल्या लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून घेत आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार गायकवाड करत आहेत.
……….
लिफ्ट कोसळून मजुर ठार
नाशिक : बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची मालवाहु लिफ्ट कोसळल्याने यात गंभीर जखमी झालेल्या बांधकाम मजुराचा मृत्यू झाल्याची घटना गंगापूर रोड परिसरातील दत्त चौक परिसरात घडली. मिलंग संजय पवार (२६, पवारवाडा, हर्षलकल ता. त्र्यंबकेश्वर) असे या घटनेत मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार गंगापूर रोड परिसरातील दत्त चौक येथे कटारीया बंगलो येथे बांधकाम सुरू होते. दरम्यान अचानक लिफ्ट कोसळल्याने खाली उभा असलेल्या पवार याच्या डोक्यास व पायास गंभीर दुखापत झाली होती. त्यास खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात नोंेद करण्यात आली आहे. अधिक तपास उपनिरिक्षक माळी करत आहेत.