सिरीन मेडोजमध्ये घरफोडी
नाशिक : घरमालकाच्या गैरहजेरीत चोरट्याने घरात प्रवेश करत सोने व चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना सिरीन मेडोज, गंगापूर रोड, नाशिक येथे घडली. याप्रकरणी अनिल मनोहर देशमुख यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देशमुख यांच्या गैरहजेरीत चोरट्याने त्यांच्या घरातील टॉयलेटचे गज काढून आत प्रवेश केला. घरातील सुमारे ८० हजार रुपयांचे सोने व चांदीचे दागिने लंपास केले. पुढील तपास पोलीस हवालदार झाडे करत आहेत.
……
सुपरवायझरला शिवीगाळ, मारहाण
नाशिक : कामावर गैरहजर राहिल्याप्रकरणी विचारणा केली असता राग अनावर झाल्याने कामगाराने सुपरवायझरला शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना फिल्टर प्लँट, अमरधाम रोड, गंगापूर गाव येथे घडली. याप्रकरणी हरिकिशोर चौरासिया यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित विजय पाटील (रा.गंगापूर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिल्टर प्लँटमध्ये हरिकिशोर चौरासिया सुपरवायझर आहेत. विजय पाटील गैरहजर राहिल्याने चौरासिया यांनी त्यास विचारणा केली. राग अनावर झाल्याने त्याने चौरासिया यांना शिवीगाळ करत मारहाण केली. पुढील तपास पोलीस नाईक भडिंगे करत आहेत.
…
तीन कारमधील बॅटरी लंपास
नाशिक : कारमालकाच्या गैरहजेरीत चोरट्याने तीन कारमधील बॅटरी लंपास केल्याची घटना निवृत्तीनगर, आडगाव येथे घडली. याप्रकरणी उत्तरेश्वर बाळासाहेब बोबडे यांनी आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोबडे यांनी कार निवृत्तीनगर, आडगाव येथे कार पार्क केली होती. त्यांच्या गैरहजेरीत चोरट्याने तीन कारची बॅटरी लंपास केली. पुढील तपास पोलीस हवालदार नरवडे करत आहेत.
……
किरकोळ कारणातून पती-पत्नीला शिवीगाळ
नाशिक : किरकोळ कारणातून तीनजणांनी पती व पत्नीला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना क्रोमा शोरुम ते डॉन बॉस्को स्कूलदरम्यान घडली. याप्रकरणी महिलेने गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित शारदा इंगळे, अजय सोमवंशी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला सुरक्षा विभाग, गंगापूर रोड येथे अर्जाची चौकशीसाठी तक्रारदार महिला पतीसमवेत दुचाकीवरुन जात होती. त्यावेळी पाठीमागून रिक्षातून दोघेजण त्यांच्याजवळ आले. शारदा इंगळे यांनी तक्रारदार महिलेस शिवीगाळ केली. त्यावेळी महिलेचा पती मध्यस्थी करत असतांना इंगळे यांच्यासह अन्य दोघांनी महिला व तिच्या पतीला मारहाण केली. पुढील तपास पोलीस हवालदार मोरे करत आहेत.