पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी पतीवर गुन्हा
नाशिक – मद्यपी पतीच्या छळास कंटाळून विवाहितने आत्महत्या केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास पांडुरंग उंडे (४०, रा. स्वमी विवेकानंदनगर, नवीन नाशिक, मुळ पोळ, ता. जिंतुर, जि. परभणी) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पिडीतेचे वडिल भास्कर बाबुराव वांडेकर यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार २०११ मध्ये संशयित व त्यांच्या मुलीचे लग्न झाले होते. परंतु उंडे यास दारूचे वेसन असल्याने तो पैशांसाठी दररोज पत्नीला मारहाण करत होता. अखेर त्याच्या छळास कंटाळून तीने शुक्रवारी (दि.१९) राहते घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून घेत आत्मत्या केली. तीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी उंडे या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक पावरा करत आहेत.
…
अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार
नाशिक – भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना सीटिसेंटर मॉल सिग्नलजवळ घडली. विजय किशोर वैद्य (४१, रा. पाटीलनगर, पेठ विद्यालयाजवळ) असे या अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना ३ जानेवारी रोजी सिटीसेंटर मॉलकडून गोविंदनगरकडे जणार्या मार्गावर दगडी घराजवळ घडली होती. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार वैद्य हे आपल्या अॅक्टीवा दुचाकीवरून घरी जात असताना पाठीमागून आलेल्या भरधाव चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये वैद्य गंभिर जखमी झाले होते. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक निरिक्षक शिंदे करत आहेत.
….
दुचाकींचे नुकसान करत टोळक्याची भद्रकालीत दहशत
नाशिक – हातात लाठ्या काठ्या घेऊन आरडाओरड करत तेथील दुचाकी खाली पाडून तीची तोडफोड करत सात ते आठ जणांच्या टोळक्याने भद्रकालीतील तिवंधा चौक येथे दहशत पसरवल्याचा प्रकार शिवजयंतीदिनी शुक्रवारी (दि.१९) रात्री घडला. याप्रकरणी संजय काशिनाथ केदार (५३, रा. तिवंधा चौक, भरद्रकाली) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार शुक्रवारी रात्री सात ते आठ जणांच्या टोळक्याने तिवंधा चौक व परिसरात लाठ्या काठ्या घेऊन आरडाओरड करत दुचाकींचे नुकसान करून परिसरात दहशत पसरवली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक सहायक निरिक्षक तपास जितेंद्र माळी करत आहेत.
…..
तडीपार जेरबंद
नाशिक – शहर व जिल्ह्यातून तडीपार केलेले असतानाही शहरात वावारणार्या तडीपारास सातपूर पोलीसांनी शनिवारी (दि.२०) रात्री जेरबंद केले. तुकाराम दत्तु चोथवे (२९, रा. क्रांतीचौक पंचवटी) असे अटक करण्यात आलेल्या सराईताचे नाव आहे. चौथवे यास २ नोव्हेंबर २०२० रोजी परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांनी दोन वर्षासाठी हद्दपार केले आहे. असे असतानाही तो कोणतीही परवानगी न घेता शहरात आढळून आला. चौथवे हा सातपूर परिसरातील पपया नर्सरी परिसरात असल्याची माहिती मिळताच सातपूर पोलीसांनी सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. याप्रकरणी त्यावर सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक झोले करत आहेत.
….