दिवाळीची खरेदी करणे महिलेस पडले महागात, पर्समधून रोकडसह मोबाईल लंपास
नाशिक : दिवाळीची खरेदी करणे एका ४५ वर्षीय महिलेस चांगलेच महागात पडले. गर्दीत खरेदी करीत असतांना महिलेच्या पर्स मधून चोरट्यांनी मोबाईल आणि रोकड असा ऐवज हातोहात लांबविला. ही घटना मुख्यबाजार पेठ असलेल्या वर्दळीच्या मेनरोड भागात घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्मिता कृष्णा चव्हाण (४५, रा. कलानगर, इंदिरानगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. चव्हाण व त्यांच्या आई रविवारी (दि.१) दिवाळीची खरेदी करण्यासाठी मेनरोड भागात गेल्या होत्या. धुमाळ पॉईंट येथील आकाश कंदिल दुकान परिसरात त्या खरेदी करीत असतांना अज्ञात चोरट्यांनी गर्दीची संधी साधून त्याच्या पर्स मधील मोबाईल व ३ हजाराची रोकड असा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार कदम करीत आहेत.
……
अल्पवयीन मुलीचा विनयभंग
नाशिक : सोशल मिडियावर ओळख वाढून एकाने अल्पवयीन मुलीस गाठून तिचा विनयभंग केल्याची घटना भाभानगर परिसरात घडली. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात विनयभंगासह बालकांचे लैंगिक शोषणापासून संरक्षण (पोस्को) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी संशयीतास बेड्या ठोकल्या आहेत.
प्रथमेश हिरवे (२१, रा. भाभानगर) असे अटक करण्यात आलेल्या संशयीताचे नाव आहे. परिसरातील पंधरा वर्षीय मुलीने दिलेल्या तक्रारीवरून संशयिताने इंन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिच्याशी ओळख वाढवली. त्यानंतर त्याने थेट पिडीतीच्या मोबाईलवर अश्िलल व्हिडीओ पाठवले. गेल्या शुक्रवारी (दि.२३) मुलगी भाभानगर येथील नवशक्ती चौकातून पायी जात असतांना संशयीताने तिला रॉयल पार्क या इमारतीसमोर अडवून विनयभंग केला. मुलीने आपबिती कुटूंबियाकडे कथन केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सोमनाथ गेंगजे करीत आहेत.

…….
दिड लाखाची पोत भामट्यांनी पळविली
नाशिक : जागरण गोंधळाच्या कार्यक्रमास जाणा-या महिलेच्या गळयातील दीड लाख रूपये किमतीची सोन्याची पोत दुचाकीस्वार भामट्यांनी हिसकावून नेली. ही घटना गंगापूर रोड भागात घडली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेखा दत्तात्रेय कानकाटे (५५, रा. हनुमानवाडी, मखमलाबादरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. कानकाटे या रविवारी (दि.१) सायंकाळी गंगापूररोड येथील शहिद चौकात राहणा-या नातेवाईकांकडे जागरण गोंधळाच्या कामानिमित्त गेल्या होत्या. शहिद चौकातून त्या पायी नातेवाईकांच्या घराकडे पायी जात असतांना मंडपा शेजारीच पाठीमागून आलेल्या यामाहा दुचाकीस्वारांपैकी एकाने त्यांच्या गळयातील सुमारे दीड लाख रूपये किमतीची सोन्याची पोत खेचून पोबारा केला. अधिक तपास उपनिरीक्षक शेंडकर करीत आहेत.

युवकावर रिक्षाचालकावर चॉपरचा हल्ला
नाशिक : मागील भांडणाची कुरापत काढून टोळक्याने एकावर चॉपरने हल्ला केला. तर भांगार चोरी प्रकरणी अटकाव केल्याने टोळक्याने बापलेकास मारहाण करून जखमी केल्याची घटना औद्योगीक वसाहतीतील सिमेन्स कंपनी परिसरात घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला.
आकाश सिंग , कुलदिप मुसळे, विशाल मोरे व किरण भोये (रा. सर्व अंबडगाव) अशी युवकावर हल्ला करणा-या संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी अश्पाक रफिक पठाण (१९ रा.बजरंगवाडी, विल्होळी) याने तक्रार दाखल केली आहे. पठाण शनिवारी (दि.३१) रोजी सिमेन्स कंपनीजवळील आरपी स्विट रिक्षा थांब्यावर उभा असतांना ही घटना घडली. संशयीतांपैकी आकाश सिंग याने मागील भांडणाचा राग मनात धरून काही एक न बोलता पठाणवर वार केला. तर उर्वरीतांनी त्यास लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. अधिक तपास हवालदार भड करीत आहेत. तर मुकूंदा सखाराम भोये (४६ रा.व्यंकटेश इंजि.) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अश्फाक पठाण व त्याच्या दोन तीन साथीदारांनी शनिवारी पहाटेच्या सुमारास एमएच १५ एफयू ७६४९ या रिक्षात कंपनीतील भंगार चोरी करण्याचा प्रयत्न केला. भोये यांनी त्यास अटकाव केला असता संशयीतांनी लोखंडी रॉड व लाकडी दांड्याने मारहाण करून जखमी केले. यावेळी भोये यांचा मुलगा किरण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात असल्याच्या माहितीवरून संशयीतांनी त्यास वाटेत अडवून बेदम मारहाण केली. तसेच त्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शिंदे करीत आहेत.

………
कारचालकास भोसकले
नाशिक : कट मारल्याच्या कारणातून कार अडवित दुचाकीस्वारांनी चालकास बेदम मारहाण करीत धारदार चाकूने भोसकल्याची घटना जयभवानी रोड भागात घडली. याप्रकरणी अज्ञात दुचाकीस्वारांविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निलेश संतोष जाजू (रा.प्राईड रेसि.) यांनी तक्रार दाखल केली आहे. जाजू गेल्या गुरूवारी (दि.२२) कामानिमित्त जयभवानी रोड भागात गेले होते. सायंकाळच्या सुमारास ते आपल्या कारमधून परतत असतांना ही घटना घडली. जेतवननगर मार्गे ते नाशिकच्या दिशेने प्रवास करीत असतांना सेंट झेवीयर शाळे मागे पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील दोघांनी कार अडविली. यावेळी संतप्त दोघांनी शिवीगाळ करीत जाजू यांना कारमधून बाहेर खेचत लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी एकाने त्याच्याकडील धारदार चाकू त्यांच्या पोटात खुपसला. अधिक तपास जमादार काकड करीत आहेत.

मासेमारी करणा-या युवकाचा मृत्यु
नाशिक : मासेमारी करीत असतांना युवकाचा मृत्यु झाल्याची घटना बेलतगव्हाण ता.जि.नाशिक शिवारात घडली. बराच वेळ उलटूनही घरी न पोहचल्याने कुटूंबियांनी त्याची शोधाशोध केली असता ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. गणेश दामू माळी (२७ रा.बेलतगव्हाण ता.जि.नाशिक) असे मृत युवकाचे नाव आहे. गणेश माळी रविवारी (दि.१) सकाळी मासे मारी करण्यासाठी वालदेवी नदी पात्रात गेला होता. दुपार उलटूनही तो घरी न परतल्याने कुटूंबियांनी शोधाशोध केली असता त्याचा मृतदेही नदीपात्रातील पाण्यात मिळून आला. याप्रकरणी गोकुळ कुटे यांनी दिलेल्या खबरीवरून पोलीस दप्तरी मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार भोईर करीत आहेत.