हर्षल भट, नाशिक
कोरोनाचा प्रादुर्भावामुळे देशातील लोकप्रिय अशा आयपीएलला आज सुरुवात झाली. त्याच पार्श्वभूमीवर आता आयपीएलचे अनोखे मास्क बाजारात दाखल झाले आहे. कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी मास्क लावणे सक्तीचे झाले आहे. नाशिक शहरात नागरिकांना मास्क लावणे बंधनकारक झाले असून आयपीएलच्या टीमचे नाव असलेल्या मास्कची क्रेझ दिसून येत आहे. आकर्षक मास्कने आता क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे. मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स यासह इतर टीमच्या मास्कचे आकर्षण दिसून येत आहे. आयपीएल सुरू झाल्यावर दरवर्षी नवनवीन वस्तू दाखल होत असतात, यंदा कोरोनाचे सावट पाहता आयपीएल मास्क ग्राहकांच्या पसंतीस उतरणार हे नक्की.