नवी दिल्ली – देशात कोरोना लसीकरण सुरू झाले असतानाच नवा वाद पुढे आला आहे. येथील राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी कोव्हॅक्सिन ही लस घेण्यास नकार दिला आहे. आम्हाला कोविशिल्ड हीच लस देण्यात यावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. या मागणीचे पत्रच त्यांनी वैद्यकीय अधिक्षकांना दिले आहे. त्यामुळे देशभरात ही बाब चर्चेची ठरली आहे. कोव्हॅक्सिन या लसीच्या सर्व चाचण्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे लसीकरणाचा उद्देश सफल होणार नाही. त्याऐवजी कोविशिल्ड ही लस देण्यात यावी, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
डॉक्टरांनी दिलेले पत्र असे