नवी दिल्ली – तज्ज्ञांच्या शिफारशी नंतर भारत सरकारने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या स्थानिक पातळीवर बनविलेल्या ऑक्सफोर्ड कोविड -१ ‘लस’ कोविशिल्ड ‘या दोन डोसमधील अंतर वाढवण्याबाबत आता राज्य व केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे. अगोदर २८ दिवसाचे अंतर होते. आता ते वाढवण्यात आले आहे. सूत्राच्या माहितीनुसार ते ६ ते ८ आठवड्याचे करण्यात आले आहे.दोन डोसमधील सुधारित अंतराचा हा निर्णय केवळ कोविशील्डवरच लागू आहे, कोवाक्सिनवर नाही, असे आरोग्य मंत्रालयाच्या अधिका-यांनी स्पष्ट केले आहे.
कोविशिल्ड ‘या दोन डोसमधील अंतर वाढवण्याबाबत नॅशनल टेक्निकल व नॅशनल एक्सपर्ट यांनी कोविड-१९ या बैठकीत हा निर्णय घेतला. त्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला तसे करण्याचा सल्ला देण्यात आला. या सल्ल्याचा विचार करत केंद्र सरकारने कोविशिल्ड लसीच्या पहिला डोस आणि दुसऱ्या डोसमधील अंतर ६ ते ८ आठवड्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत केंद्राने नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.