कोल्हापूर – कोविड सेंटरमधील आरोग्य सेविकेंचा नवदुर्गाचा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. नवरात्रोत्सवात कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यामधील हा फोटो आहे. या फोटोत या आरोग्यसेविकांच्या हातात सलायन स्टॅन्ड, स्टेथस्कोप त्याचबरोबर आरोग्यविषयक साधनांचा समावेश आहे. कोरोनामुळे मंदिर बंद असले तरी नवदुर्गाचे हे फोटो महिलांमध्ये उर्जा निर्माण करणारे आहे. कोरोना काळात वैद्यकिय सेवा हीच महत्त्वाची ठरली आहे. त्यामुळे या सेविकांनी आपले काम करतांना हा उर्जा देणारा फोटो व्हायरल केल्यामुळे तो चर्चेचा सुध्दा ठरला आहे.