नाशिक – कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने दर शनिवार आणि रविवार सुरू झालेल्या लॉकडाऊनला नाशिककरांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. याद्वारेच कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडणे शक्य होणार आहे. शहर परिसरात केवळ अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. त्यामुळे प्रमुख रस्त्यांवरही शुकशकाट पहायला मिळत आहे. अशाच प्रकारे काही आठवडे हा लॉकडाऊन शनिवारी आणि रविवारी यशस्वीरित्या पाळण्यात आला तर कोरोनावर नियंत्रण मिळविणे शक्य होणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. दरम्यान, नाशिक महापालिका प्रशासनाने नाशिककरांच्या या पुढाकाराचे स्वागत केले असून यापुढेही असेच सहकार्य करावे, अशी विनंतीही केली आहे.
बघा आज शहराच्या विविध भागातील हे चित्र
अशोक स्तंभ परिसर
सर्व फोटो – राहूल भदाणे