नाशिक – कोविडचा प्रसार वेगाने होत असून त्याला रोखण्यासाठी शासकीय व सामाजिक पातळीवर विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याला प्रतिसाद मिळत आहे. सोशल मिडीया, दैनिक यातूनही याबाबत काळजी घेण्याविषयी तज्ञांकडून मार्गदर्शन मिळत आहे. याच जाणिवेतून रेडिओ विश्वास कम्युनिटी रेडिओतर्फे अभिनव कार्यक्रमांचे वेळोवेळी आयोजन करण्यात आले आहे.
रेडिओ विश्वास कम्युनिटी रेडिओ व एसबीसी ३ (सेंटर फाॅर सोशल & बिव्हेविअर चेंज कम्युनिकेशन) यांचे संयुक्त विद्यमाने कोविड १९ परिस्थिती आणि शिक्षण या विषयावर १५ मिनिटांची चर्चासत्र स्पर्धा आयोजित केली आहे.
या चर्चासत्रातून नागरिकांना कोरोना व्हायरस प्रादुर्भावाच्या काळात बंद असलेल्या शाळा, महाविद्यालये व त्यामुळे ऑनलाईन शिक्षण पद्धती, आवश्यकता किंवा महमारीच्या काळात शिक्षणाविषयी उपाययोजना याबाबत आपले मत व्यक्त करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. याकरीता कोणत्याही समुदायातील ३ ते ४ जणांनी एकत्र येउन वरील विषयावर आपले विचार व्यक्त करायचे आहे, आणि रेकॉर्डिंग करून रेडिओ विश्वासच्या radiovishwas@gmail.com वर पाठवायचे आहे.
तरी यात जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवण्याचे आवाहन विश्वास ग्रुपचे कुटुंबप्रमुख विश्वास जयदेव ठाकूर व रेडिओ विश्वासचे स्टेशन डायरेक्टर डॉ. हरी कुलकर्णी यांनी केले आहे.