कोल्हापूर – लाच देणे आणि घेणे गुन्हा असला तरी त्याची कुठलीही पर्वा सरकारी अधिकाऱ्यांना नसल्याचे दिसून येत आहे. येथील मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक रचनाकार गणेश हणमंत माने हा वर्ग २चा अधिकारी तब्बल २० लाखाची लाच घेताना सापडला आहे. विशेष म्हणजे ही लाच तब्बल ४५ लाखाची होती. त्याचा पहिला हप्ता २० लाख रुपये घेताना माने हा रंगेहाथ पकडले गेला आहे. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) माने यास ताब्यात घेतले आहे.
अवसायनात गेलेल्या सूतगीरणीचे शासकीय मूल्यांकन काढून देण्यासाठी तब्बल ४५ लाखाची लाच मागण्यात आली होती. याप्रकरणी एसीबीकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर एसीबीने सापळा रचला. माने हा हॉटेलच्या टपरीवर २० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडल्या गेला. त्यामुळे एसीबीकडून पुढील तपास कसून सुरू असून गुन्हा दाखल करण्याचे कामही सुरू आहे.