नवी दिल्ली – कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने मुले शाळेच्या वर्गात आणि आवारात सुरक्षित असली पाहिजेत, कोरोना संक्रमण होऊ नये, याकरिता सीबीएसई आणि आयसीएसईकडून यासंदर्भातील
शाळांना मार्गदर्शक सूचना पाठविण्यात आल्या आहेत.
मार्गदर्शक सूचनानुसार शाळेच्या वतीने विद्यार्थी व विद्यार्थिनींची नियमित तपासणी केली जाणार असून यासाठी प्रत्येक मुलाचे आरोग्य कार्ड बनवले जाईल. या कार्डद्वारे, दरमहा नियमित आरोग्य चाचण्या केल्या जाऊ शकतात.
नवीन सेमिस्टरपासून नियमित तपासणी :
विद्यार्थी पाच ते सहा तास शाळेत राहतात. एकमेकांना भेटतात, एकत्र राहतात. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या येणार नाही, त्यासाठी नियमित तपासणी केली जाईल. नवीन सत्रात शाळेच्या वेळापत्रकात याचा समावेश आहे. तसेच हेल्थ कार्ड तयार करण्यात येईल.
दर १५ दिवस आरोग्य शिबिराचे आयोजन
दर 15 दिवस प्रत्येक शाळेत आरोग्य शिबिराचे आयोजन देखील केले जाईल. यात आरोग्य विभागाच्या शिबिरामध्ये प्रत्येक विभागाच्या डॉक्टरांना शाळेत बोलावले जाईल. आरोग्य शिबीर महिन्यातून दोनदा अनिवार्यपणे आयोजित केले जाईल. त्यामध्ये डॉक्टरांची पूर्ण टीम असेल.
हँडवॉश स्टेशन बनविण्यात येईल:
प्रत्येक शाळेत हँडवॉश स्टेशन बनवले जाईल. तसेच हात धुण्यापासून होणाऱ्या फायद्यांबद्दल माहिती देण्यात येईल. आरोग्य पत्रिका शाळेच्या गेट, भिंत आदींवर चिकटवल्या जातील. विद्यार्थ्यांना दुपारच्या जेवणाच्या हात धुण्याचे महत्त्व सांगितले जाईल. त्याशिवाय फोटोसह कोरोना इन्फेक्शनपासून बचाव संबंधित माहिती शाळेच्या गेटवरही बसविण्यात येणार आहे.
हेल्थ कार्डद्वारे होणार फायदेः
– नियमित आरोग्य तपासणी करून विद्यार्थ्यांची आरोग्य माहिती अद्यावत करण्यात येईल.
– कोणत्याही प्रकारचा आजार असल्यास लगेच कळेल.
– ही लस कधी दिली जाईल, याचीही माहिती मिळेल.
– मुलांच्या आरोग्याची नोंद पालकांकडे जमा केली जाईल.
– मुलांच्या आरोग्याशी संबंधित माहिती पालकांना सांगून नियमित आरोग्य चाचण्या करण्याचे देखील सांगितले जाईल.