( कोरोना पॉझिटीव्ह अपडेट्स : सायंकाळी ७ वाजेपर्यंत )
नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख १५ हजार ७९० कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत १ हजार ७३१ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत २ हजार ८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, शुक्रवारी उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या १ हजार ३५७ होती. पण, शनिवारी ११ पर्यंत ही संख्या १ हजार ५४४ झाली आहे. त्यानंतर ही संख्या आता १ हजार ७३१ वर गेली आहे. काही दिवसापासून ही संख्या कमी होत होती. पण, अचानक वाढलेल्या या संख्येमुळे चिंता वाढली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ४५, चांदवड १४, सिन्नर ५५, दिंडोरी ३९, निफाड ९६, देवळा १९, नांदगांव ५२, येवला २७, त्र्यंबकेश्वर ३६, सुरगाणा ०९, पेठ ०२, कळवण १५, बागलाण २८, इगतपुरी १४, मालेगांव ग्रामीण ३४ असे एकूण ४८५ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १०२०, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात २०७ तर जिल्ह्याबाहेरील १९ असे एकूण १ हजार ७३१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात १ लाख १९ हजार ६०६ रुग्ण आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ९६.४० टक्के, नाशिक शहरात ९७.५२ टक्के, मालेगाव मध्ये ९२.५९ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९४.३४ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९६.९६ इतके आहे.
लक्षणीय :
– १ लाख १९ हजार ६०६ कोरोनाबाधित रुग्णांपैकी १ लाख १५ हजार ७९० रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
जिल्हा माहित कार्यालयाकडून आलेली माहिती
*Total recovered :115790*
*Total death : 2085*
*Active case in the district: 1731*
*Nashik NMc: (active patients)*: *1020*
*Nashik Rural (active patients)*: *485*
Nashik :45
Baglan:28
Chandwad :14
Deola: 19
Dindori:39
Igatpuri:14
Kalwan:15
Malegoan :34
Nadgaon:52
Niphad:96
Peth:02
Sinner:55
Surgana: 09
Trimbak:36
Yeola: 27
*Malegaon MMC (Active patients)*: *207*
*Out of district (Active Patients) :19*
*Total cumulative positive cases : 119606*