नवी दिल्ली – कोरोनाला घाबरलेल्या आणि कंटाळलेलले लोक आता कोरोनाच्या लसीची वाट पाहत आहेत. हीच लस लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचावी म्हणून लवकरच केंद्र सरकार एक ऍप आणत आहे. कोवीन नामक या ऍपमध्ये कोणी ही लस घेतली आहे, खरेदी कोणी केली आहे, किती वितरण झाले आहे, आणि त्याचा साठा किती आहे आदींची माहिती असणार आहे.
डेटा अपलोड करण्यासोबतच माहिती मिळवण्यासाठी हे ऍप उपयोगी असेल. याचबरोबर राज्यांकडून केंद्र सरकारला देखील आवश्यक ती माहिती आणि डेटा उपलब्ध करून देणे सोयीचे होईल. आयसीएमआर, आरोग्य मंत्रालय, आणि आयुष्मान भारत हे विभागदेखील यात सहभागी आहेत. ही लास घेतली की, त्याचे प्रमाणपत्र देखील या ऍपवर असेल. हे प्रमाणपत्र आपण डीजी लॉकरमध्ये आपण संग्रहित करू शकतो. कोरोनावर मात करण्यासाठी ही लस अत्यंत उपयुक्त ठरणार असून त्याची माहिती ठेवणे फार आवश्यक आहे.