नवी दिल्ली – भारतात कोरोना लस उपलब्ध होण्यासंदर्भातील अत्यंत महत्त्वाचे वृत्त आहे. भारतातील सीरम इन्स्टिट्यूटने इंग्लंडच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाशी करार केला आहे. त्यानुसार सीरमला १० कोटी डोस उपलब्ध होणार आहेत. ही लस भारतात फेब्रुवारीपासून उपलब्ध होण्याची चिन्हे आहेत.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. कोरोना लशीचे १० कोटी डोस तयार करण्यात येत आहेत. या लशीची तिसरी फेरी यशस्वी झाल्यानंतर ती इंग्लड येथे पाठविण्यात येईल, तसेच औषध नियामकांकडून तातडीने मान्यता मिळाल्यास लवकरच ही लस भारतात उपलब्ध होऊ शकेल. त्यामुळे जानेवारीपर्यंत किमान १० कोटी डोस उपलब्ध होतील. तर फेब्रुवारी अखेरीस या लसीचे आणखी मोठ्या प्रमाणात डोस तयार करण्यात येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
सदर कोरोना लस चाचणी ९० टक्क्यांपर्यंत प्रभावी ठरली आहे. लवकरच ही लस सर्वांसाठी सर्वत्र उपलब्ध होईल.कोरोनाविरूद्धच्या लढ्यात आम्ही आता मोठे यश मिळविले आहे, असे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने जाहीर आहे.