नवी दिल्ली – ऑक्सफर्ड युनिवर्सिटीने सोमवारी दिलेल्या महितीनुसार त्यांनी तयार केलेली लस ९० टक्के यशस्वी असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या लसीला युनिवर्सिटीच्या जेनर इन्स्टिट्यूटमध्ये विकसित करण्यात आले आहे. येथेच मलेरिया, टिबी आणि इबोला या आजारांवर लस तयार करण्यात आली होती. लस तयार करणार्या शास्त्रज्ञांची ५ जणांची टिम आहे. युनिवर्सिटीतर्फे या पाच जणांना ‘फंटास्टीक फाइव्ह’ म्हणून संबोधले आहे. यातील एकाने माऊंट एव्हरेस्ट सर केला आहे. यातील अतिरिक्त टिममध्ये एक भारतीय शास्त्रज्ञ देखील सहभागी आहे.
कमी गुण मिळाल्यामुळे मेडिकलला प्रवेश नाही
प्रो. कैटी ईवर यांना मेडिकलमध्ये प्रवेश घेण्यासाठी कमी गुण मिळाले होते. त्यानंतर त्यांनी मायक्रो बायोलॉजीचे शिक्षण घेतले व त्यात पदवी मिळवली. इम्युनोलॉजी त्यांना आवडत नव्हते मात्र, संक्रमण होत असलेल्या आजारांवर प्रतिबंध म्हणून त्यांनी नेहमीच त्याकडे विशेष लक्ष दिले. त्यांनी १३ वर्ष मलेरियाच्या लसीवर काम केले. यावेळी कोरोनाची लस तयार करत असताना त्यांनी सोशल मीडियाचा वापर पुर्णपणे बंद केला.
मुलांना सांभाळून जबाबदारी केली पूर्ण
सारा गिलबर्ट या टिमच्या मुख्य आहेत. त्यांना २५ वर्षांचा अनुभव आहे. त्यांचा जन्म १९६२ साली झाला असून त्यांना तीन मुले आहेत. सध्या हे तिन्ही अपत्य युंनिवर्सिटीमध्ये शिक्षण घेत आहे. घरातले काम सांभाळून लस तयार कर्णयसाठी त्या तत्पर आहेत. अशावेळी मुलांसह ४ तास आनंदात मिळाले तरी त्या धन्यता मानतात.
निरीक्षण करून लस तयार करण्यात यशस्वी
आयर्लंड येथील लसतज्ञ एड्रियन हिल हे लस तयार करणार्या जेनर संस्थेचे अध्यक्ष आहेत. १९८० साली झीबाम्बे येथे एका दवाखान्यात काम करणार्या एका कर्मचार्याला भेटल्यास लस तयार करण्यासाठी त्यांना उत्सुकता वाटू लागली. त्यांनी सांगितले की, ते परत आल्यावर इंग्लंड आणि आयरलँडमध्ये आजार कमी झाल्याचे आढळून आले.
माऊंट एव्हरेस्ट केला सर
एंड्र्यु पोलार्ड लस तयार करणार्या टिमचे डायरेक्टर आहे. त्यांनी ४६ रिसर्च पेपर प्रसिद्ध केले आहे. त्यांचे ३७ विद्यार्थी पीएचडी प्राप्त आहेत. संक्रमित रोग विषयावर त्यांचे ५०० हून अधिक पुस्तके प्रसिद्ध झाले आहेत. १९८८ मध्ये ६६३२ मीटर उंच जोन्वली आणि १९९१ मध्ये ७३०९ मीटर उंच चामलांग चोटी सर केले आहे. १९९४ मध्ये त्यांनी एव्हरेस्ट सर केला आहे.
आव्हानात्मक करण्याची जिद्द
जेनर संस्थेची सह शिक्षक टेरेसा लाम्बे यांनी इबोला आजाराच्या लसीवर काम केले आहे. २००२ मध्ये त्या युनिवर्सिटीशी जोडल्या गेल्या. पती आणि मुलांसोबत वेळ घालवणे त्या पसंत करतात. कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये आव्हानात्मक करण्याची त्यांची इच्छा होती. त्यानुसार त्यांना या टिममध्ये सहभागी करून घेण्यात आले.