नवी दिल्ली – आपल्याला कोरोनाची लस घ्यायची असेल आणि जवळच्या केंद्राबद्दल माहिती हवी असेल तर गुगल शोध नकाशाद्वारे आणि सहाय्यकाद्वारे आपल्याला योग्य माहिती देईल. लोकांना मदत करण्यासाठी लवकरच ही सेवा सुरू करणार असल्याचे या कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.
गुगलने ब्लॉगस्पाटमध्ये म्हटले आहे की, गुगल टीम कोरोना लसीशी संबंधित लोकांच्या प्रश्नांची त्वरित व अचूक उत्तरे देण्याचे काम करीत आहे. योग्य माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी गुगलने आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि बिल आणि मिलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या सहकार्याने काम सुरू केले आहे.
लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यानंतरच कोविडशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी गूगलने आता गुगल सर्चमध्ये एक ज्ञान पॅनेल सुरू केले. लोकांना योग्य माहिती देऊन मदत करण्याच्या उद्देशाने याची सुरुवात केली गेली आहे. याअंतर्गत इंग्रजी, हिंदी यासह ८ भाषांमध्ये या दोन लसी, त्याचे परिणाम, सुरक्षा, वितरण, दुष्परिणामांची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे.