ऑनलाईन नोंदणी व लसीकरणच्या वेळीही पुढीलपैकी एक ओळखपत्र बंधनकारक असेल. यासाठी अनेक कागदपत्रांची यादी तयार आहे. यात ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, बँक पासबुक किंवा पोस्ट ऑफिसने दिलेले पासबुक, मनरेगा जॉब कार्ड, पासपोर्ट, पेन्शन संबंधित कागदपत्रे आणि राज्य किंवा केंद्राद्वारे दिलेली सेवा ओळखपत्र इत्यादींचा समावेश आहे. लसीकरणच्या वेळीही ओळखपत्र दाखवणे बंधनकारक असेल.
दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना लसीकरणातील शंका दूर करण्यासाठी प्रश्न-उत्तर स्वरूपात तथ्य प्रसिद्ध केले आहे. राज्य सरकारकडूनही केंद्रातील प्रश्न आणि उत्तरे जाहीर करण्यात आली आहेत. त्यात नमूद केले आहे की, कोणत्याही व्यक्तीला नोंदणीशिवाय लसी दिली जाणार नाही. यापूर्वी ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनाही कोरोना लसचा संपूर्ण डोस घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यामुळे रोगाविरूद्ध तीव्र प्रतिकारशक्ती विकसित होईल. सुरुवातीच्या टप्प्यात आरोग्य कर्मचार्यांना प्राधान्याने तशी लसी दिली जाईल. यानंतर ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना प्राधान्याने समाविष्ट केले जाईल. उपलब्धतेनुसार इतर लोकांना नंतर लसी दिली जाईल. तसेच कोरोनाची लस घेणे त्या व्यक्तीच्या इच्छेवर अवलंबून असते, मात्र लसचा संपूर्ण डोस घेण्याचा सल्ला दिला जाणार आहे.