पाटणा – बिहार विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रचाराने वेग घेतला असताना आता कोरोना लसीवरुन मोठा वादंग निर्माण झाला आहे. बिहारमध्ये भाजपची सत्ता आल्यास राज्यातील सर्व नागरिकांना मोफत लस देण्यात येईल, असे आश्वासन भाजपने जाहीरनाम्यात म्हटले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते या जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. मात्र, लसीच्या या आश्वासनावरुन देशभरात टीका सुरू झाली आहे. राजदचे नेते तेजस्वी प्रसाद म्हणाले की, कोरोना लस संपूर्ण देशाची आहे, एकट्या भाजपची नाही, अशी टीका त्यांनी केली.
सपचे नेते अखिलेश यादव म्हणाले की, बिहारसारखीच घोषणा उत्तर प्रदेश आणि इतर भाजपशासित राज्यांसाठी का केली जात नाही? तर, बिहार भाजपचे प्रभारी भूपेंद्र यादव म्हणाले की, ‘किरकोळ दरात सर्व भारतीयांना लस उपलब्ध करून दिली जाईल. राज्ये ती मोफत देऊ शकतात.’
जी कोरोना लस अद्याप उपलब्धच नाही तिचे आमिष देऊन मतदारांना भुलविण्याचा प्रयत्न करुन राजकीय पक्ष त्यांचा स्वार्थी चेहरा समोर करीत आहेत, अशी टीका अनेकांनी केली आहे.