एका वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्याने सांगितले, कोरोना लसीचा कमी खर्च आणि प्रभावी डेटाच्या आधारे मागणी सातत्याने वाढत आहे. भारत आधी आपल्या गरजा पूर्ण करेल आणि जगातील इतर देशांना पुरवठा सुनिश्चित करेल, असे त्यांनी सांगितले. आतापर्यत ब्राझील, मोरोक्को, सौदी अरेबिया, म्यानमार, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, मंगोलिया, श्रीलंका या देशांनी अधिकृतपणे भारताकडून लसींची मागणी केली आहे.
कोरोना लसीच्या वितरणात भारत सरकार बांगलादेश, भूतान, नेपाळ, श्रीलंका आणि अफगाणिस्तान सारख्या शेजारी देशांकडे लक्ष विशेष देणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तसेच अन्य देशांकडून येणारी मागणी पूर्ण करण्यासाठी देखील प्रयत्न केले जातील. यापुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत की, भारत जगासाठी एक मोठी आशा बनला असून संपूर्ण जग भारताच्या लसीची वाट पाहत आहे. कोरोना लस संदर्भात केवळ आशियाई देशच नाही तर अनेक बिगर आशियाई देशांनीही भारताशी संपर्क साधला आहे. या मागण्या आगामी काळात वाढतील.