नाशिक – शहरामध्ये कोरोना लस आल्यानंतर करावयाच्या कामगिरीबाबत महापालिकेला मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत. याच अंतर्गत राज्यामध्ये उद्या (८ जानेवारी) ड्राय रन (रंगीत तालिम) संपन्न होणार आहे. हा ड्राय रन नाशिक रोड येथील नवीन बिटको रुग्णालय नाशिक येथे घेण्यात येणार आहे. यामध्ये आरोग्य सेवक लस घेण्यास आल्यास त्यास पहिले समुपदेशन करून लस देणे, लस दिल्यानंतर ऑब्झर्वेशन करणे या बाबींचे ड्राय रन करण्यात येणार आहे. सदर ड्राय रन करिता सकाळी १० वाजता महापालिका आयुक्त कैलास जाधव व अन्य आरोग्य कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. लस प्रथम सर्व आरोग्य कर्मचारी यांना देण्यात येणार आहे. तशी माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली आहे.