नवी दिल्ली ः संपूर्ण जगाला वेठीस धरलेल्या कोरोना विषाणूविरोधात मोठा लढा देण्यासाठी सरकराने कंबर कसली आहे. कोरोना आजार रोखणं सरकारसमोरचं मोठं लक्ष्य असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी स्पष्ट केलं. कोरोना लसीकरणासाठी ३५ हजार कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
देशातल्या नागरिकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्यात आले असून आरोग्य सेवेसाठी मोठी तरतूद केली आहे. त्याअंतर्गत १५ आपत्कालीन आरोग्य केंद्र, २ मोबाईल हॉस्पिटलची घोषणा करण्यात आली आहे. १७ नवे सार्वजनिक आरोग्य केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. आरोग्य क्षेत्रात संशोधनासाठी नवी संस्थांची उभारणी करण्यात येणार आहे.
- आरोग्य क्षेत्रासाठी केलेल्या तरतूदी
– कोरोना लसीकरणासाठी अर्थसंकल्पात ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद
– आरोग्य़ क्षेत्रासाठी २ लाख २३ हजार ८४६ कोटी रुपयांची तरतूद
– आरोग्य योजनांसाठी ६४ हजार कोटींची तरतूद
– देशात १५ नवे आरोग्य केंद्र आणि २ मोबाईल हॉस्पिटल्स घोषणाही
– देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात इन्टिग्रेटेड लॅब स्थापण करणार
-. देशातल्या ११२ जिल्ह्यात मिशन पोषण योजना राबवणार